नगर : काल नगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची क्रूर हत्या करण्यात आली होती. सध्या नगर जिल्ह्यात तणावाचं वातावरण असून एनसीपीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार कालच्या पोटनिवडणुकी दरम्यानच्या मतमोजणीच्या वेळी घडला. पूर्व दूषित राजकीय वैमनस्यातून २ शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
नगरमधील पोटनिवडणुकीदरम्यानचा घटनाक्रम पाहता बिहारपेक्षाही विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांच्या या दुहेरी हत्याकांडाप्रकरनी एनसीपीचे आमदार संग्राम जगताप, संग्राम जगतापांचे वडील अरुण जगताप, भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर व त्यांचा मुलगा संदीप कोतकर यांच्या सह ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
काँग्रेस कार्यकर्ता संदीप गुंजाळ हा स्थानिक पोलिसांना शरण आला असून त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल आणि गुप्ती हस्तगत केली आहे.
