4 May 2025 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आमिर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, संपर्कातील लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Bollywood superstar, Aamir Khan, Staff Test Coronavirus Positive

मुंबई, ३० जून : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्याच्या संपर्कातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली असून याबाबतची माहिती स्वतः आमिरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच सगळे क्वारंटाईन झाले असून आमिर त्याच्या आईसह स्वतःचीही कोरोना चाचणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अमित पोस्टमध्ये म्हणाला;
माझ्या काही कर्मचाऱ्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि करोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे खूप आभार मानतो.

उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझी चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या आईला करोना चाचणीसाठी घेऊन जात आहे. तिचाही रिपोर्ट निगेटीव्ह येऊ दे अशी प्रार्थना करा. त्वरित आणि काळजीपूर्वक उपाय केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन या रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. करोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली.

 

News English Summary: Corona has infiltrated the house of Bollywood actor Aamir Khan. Some of his contacts have been infected with the corona, according to Aamir himself via Twitter.

News English Title: Bollywood superstar Aamir Khan Staff Test Coronavirus Positive News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या