2 May 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राज्यातील ग्राहकांना अवाजवी वीज बिलं, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जा मंत्र्यांच्या भेटीला

Electricity supply companies, Exorbitant bills, Meter readings, MNS delegation, Minister Nitin Raut

मुंबई, २ जुलै : वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना आवाजवी बिलं आकारले. त्यामुळे राज्यभरात याबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडाळाने आज (2 जुलै) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं. यावेळी ऊर्जामंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.

नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या बैठकीत मनसेने ऊर्जा मंत्र्यांकडे चार प्रमुख मागण्या मागितल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलं असल्याचं अभ्यंकर यांनी सांगितलं. ऊर्जा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील हेदेखील उपस्थित होते.

लॉकडाऊन काळात काही नागरिक आपल्या गावाला गेले होते. त्यांनी विजेचा वापर केला नाही. तरीही त्यांना दुप्पट-तिप्पट वीज बिल पाठवण्यात आले आहे. या विषयावर सविस्तर चर्चा झाली. काही विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. ती सध्या गावी गेली आहेत. त्यांची शहरातील घरे बंद आहेत. तरीही वीज बिल जास्त आले आहेत. आम्ही सर्व सदस्यांनी आपापल्या भागातील नागरिकांची वीज बिलं गोळा केली आहेत. काही नागरिकांचं दुप्पट तर काहीचं तीन पट, पाच पट, दहा पट जास्त बिल आलं आहे, असं अविनाश अभ्यंकर म्हणाले.

ऊर्जामंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, फक्त करेक्शन नाही, तर सुधारनेनंतरही तफावत आढळली तर तेही बघू. पण आम्ही सुधारणा केलेल्या बिलमध्ये कमीत कमी ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली आहे. कारण लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुंटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना कारावा लागत आहे. त्यामुळे याकडे माणुसकीच्या नात्याने बघितलं पाहिजे, असं आवाहन अभ्यंकर यांनी केलं.

 

News English Summary: Electricity supply companies charged customers exorbitant bills without taking meter readings. Therefore, there are voices of displeasure in this regard across the state. Against this backdrop, the MNS delegation met Energy Minister Nitin Raut today (July 2).

News English Title: Electricity supply companies charged customers exorbitant bills without taking meter readings MNS delegation met Energy Minister Nitin Raut News latest Updates.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x