9 May 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Mayor Of Pune City, Murlidhar Mohol, Corona Virus

पुणे, ४ जुलै : पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

ट्वीट करुन महापौर मोहोळ यांनी सांगितले की, “थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”

शहरात कोरोनाचा फैलाव झाल्यापासून मोहोळ दिवसरात्र काम करीत आहेत. विशेषतः वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांबाबत करारनामे करणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, त्यादृष्टीने आर्थिक तरतूदीपासून सर्व वैद्यकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोहोळ यांनी कष्ट घेतले. सातत्याने रुग्णालयांना भेटी देणे, विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सामील होणे, स्वतः बैठकी घेणे अशी कामेही सुरूच होती. या काळात त्यांची पालिकेतील दैनंदिन कामेही सुरूच होती. अनेक नागरिक त्यांना भेटायला येत होते.

 

News English Summary: Pune city Mayor Muralidhar Mohol has been diagnosed with coronavirus. Mayor Murlidhar Mohol himself has informed about this through his Twitter handle.

News English Title: Mayor Of Pune City Murlidhar Mohol Infected With Corona Virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x