4 February 2023 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार? Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर?
x

ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

Election commission, CBDT, Poll Affidavit, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (Central Board of Direct Taxes – CBDT) तशी विनंती केली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असं कर मंडळानं म्हटलं आहे.

खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या बाबतीत निवडणूक आयोगानं आपली भूमिका अलीकडेच बदलली आहे. याआधी तक्रारकर्त्यांना थेट न्यायालयात जाण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिल्या जात. मात्र, या भूमिकेत निवडणूक आयोगानं आता बदल केला आहे. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्तीचं विवरण, शैक्षणिक पात्रता या संबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायचं आयोगानं ठरवलं आहे.

जून महिन्यांत निवडणूक आयोगाने खोट्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर याबाबत घडामोडी सुरु झाल्या. १६ जून रोजी आयोगाने घोषणा केली होती की, “ज्या उमेदवारांविरोधात प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी येतील त्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल.”

दरम्यान, जर तक्रारदारांना वाटत असेल की एखाद्या उमेदवाराविरोधात खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मजबूत खटला तयार होत असेल तर त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा १२५ अ नुसार थेट कोर्टात जाण्यासाठी निवडणूक जागल्या प्रोत्साहित करीत आहेत.

“तपासणीत उमेदवाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटं बोलल्याचं आढळल्यास, आम्ही आमच्या फिल्ड ऑफिसरला उमेदवाराविरूद्ध तक्रार करण्यास सांगायला मागेपुढे पाहणार नाही. आम्ही संबंधित राजकीय पक्षांना किंवा विधानसभा किंवा सभागृहाच्या अध्यक्षांना (जिथून उमेदवार निवडला गेला होता) कळवू शकतो की त्याने किंवा तिने योग्य माहिती दाखल केलेली नाही,” असे निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी इंडियन एक्प्रेसशी २२ जून रोजी बोलताना सांगितले होते.

 

News English Summary: The Election Commission (EC) has requested the Central Board of Direct Taxes (CBDT) to probe allegations of false affidavits filed by Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, his son and state minister Aaditya Thackeray and NCP MP Supriya Sule. According to sources, CBDT has been asked to verify the assets and liabilities stated in their affidavits.

News English Title: Election commission asks CBDT To Verify Poll Affidavit Details Of CM Uddhav Thackeray Minister Aaditya Thackeray And MP Supriya Sule Marathi News LIVE latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x