9 May 2025 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण

Pune BJP MLA Mukta Tilak, Covid 19, Test positive

पुणे, ७ जुलै : पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यांसोबत एका बैठकीला मुक्ता टिळक या उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनीही आपली COVID-19 टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र टिळक यांना कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्या घरातच क्वारंटाइन झाल्या आहेत. मोहोळ यांच्या संपर्कात जे लोक आले होते, त्या सगळ्यांच्या टेस्ट करण्यात येत आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापौरांशी गेल्या चार दिवसात संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी स्व:ताला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे तर अनेक नगरसेवकही धास्तावले आहेत.

 

News English Summary: Pune BJP MLA and former mayor Mukta Tilak has contracted corona. Mayor Muralidhar Mohol is also affected by the corona. Mukta Tilak was present at a meeting with him. So he also took his COVID-19 test.

News English Title: Pune BJP MLA Mukta Tilaks Covid 19 test positive News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या