7 May 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राज्यात गेल्या २४ तासात ८,३०८ नवे कोरोना रुग्ण, २५८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, १७ जुलै: राज्यामध्ये सलग दोन दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ८ हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे. मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ८,३०८ रुग्ण वाढले आहेत, तर २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजही मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले आहेत. मुंबईत आजच्या दिवसात १,२९४ तर पुण्यात १,५३९ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात ६२ जणांचा मृत्यू झाला, तर पुणे मनपा क्षेत्रात २१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात समोर आलेल्या संख्येनुसार आज १ लाख २० हजार ४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ८ हजार ३०८ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही २ लाख ९२ हजार ५८९ इतकी झाली आहे.

 

News English Summary: The number of corona victims in the state has increased by more than 8,000 for two days in a row. In the last 24 hours, the number of corona patients in the state has increased by 8,308, while 258 deaths have been reported.

News English Title: In the last 24 hours, the number of corona patients in the state has increased by 8308 in Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या