13 February 2025 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा
x

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार - ANI वृत्त

Shocking rape, on women, Covid 19 center, Panvel Navi Mumbai

नवी मुंबई, १७ जुलै: मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला आहे. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुभम राजेंद्र खातू (वय-25, न्यू पनवेल, भगतवाडी) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कालच क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. आरोपीची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आज संध्याकाळी त्याचा रिपोर्ट येणार आहे.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा ANI’ने केला असून असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संभाव्य म्हणून दाखल झालेल्या एका तरुणीचा एका विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पीडित महिला आणि मुलगा एकाच परिसरात राहत असून मुलाने तिचा विनयभंग करून तिच्या गुप्तांगाशी विकृत चाळे केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

News English Summary: A corona-positive female patient has been overdosed at the quarantine center. The incident took place at a Navi Mumbai Municipal Corporation quarantine center in Panvel on Thursday night.

News English Title: Shocking rape on women at the Covid 19 center at Panvel Navi Mumbai News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x