28 April 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

हे काय आता? घरातच कोरोनाची लागण व्हायचा धोका जास्त, दक्षिण कोरियातील निष्कर्ष

India, Covid 19, Corona Virus, Social Distancing

सेऊल, २० जुलै : ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीचे परिणाम जाहीर झाले आणि जगभरात आशेचा किरण निर्माण झाला. चाचण्या यशस्वी झाल्याच्या या बातमीने गेले 4 महिने कोरोनामुळे नकारात्मक झालेलं वातावरण एकदम आनंदी झालं. कारण या लशीची (Covaxin) निर्मिती भारतातही होणार आहे. AstraZeneca कंपनी ही लसनिर्मिती करणार आहे आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेची करार केला असून लशीचे एक अब्ज डोस Serum Institute of India उत्पादित करणार आहे. आता लवकरच लस बाजारात येणार, अशी आशा निर्माण झाली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र या बातमीवर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे संशोधित केलेल्या या लशीच्या चाचण्यांचा अहवाल The Lancet या नामवंत विज्ञान प्रकाशनामध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ही लस सुरक्षित आणि आशादायी असल्याचं म्हटलं आहे. WHO ने सुद्धा या लशीचं स्वागत केलं आहे. पण अशा जगभरातल्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा आणखी लसी विकसित व्हायल्या हव्यात, असंही संघटनेचं म्हणणं आहे.

सध्या जगभर इतर उपाय योजना केल्या जातं आहेत यामध्ये तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय आहेत. पण आपण घराबाहेर पडताना जितकी काळजी घेतो, त्यापेक्षा किंबहुना जास्त काळजी घरी असताना घेण्याची आवश्यकता आहे. कारण घराबाहेर कमी पण घरातल्याच सदस्यांकडून कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचा निष्कर्ष दक्षिण कोरियातील साथरोगशास्त्रज्ञांनी काढला आहे.

दक्षिण कोरियात ही साथ सुरु झाल्यानंतर करोना पॉझिटिव्ह ठरलेले ५,७०६ रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले ५९ हजार जण यांचा अभ्यास करुन हा स्टडी रिपोर्ट बनवण्यात आला आहे. सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनमध्ये १६ जूलैला हा रिपोर्ट प्रकाशित झाला. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या स्टडी रिपोर्टनुसार करोनाची लागण झालेल्या १०० रुग्णांपैकी फक्त दोघांना घराबाहेरील व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे करोना झाला होता.

वयोगटाचा विचार केल्यास दक्षिण कोरियात घरातच करोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त होते. किशोरवयीन युवक-युवती आणि ६० ते ७० वयोगटातील नागरिकांना प्रामुख्याने करोनाची लागण झाली. “हे दोन्ही वयोगट कुटुंबीयांच्या जास्त संपर्कात असावेत. त्यामुळे या वयोगटांना जास्त सुरक्षेची आवश्यकता आहे” असे जीआँग यांनी सांगितले. ते कोरियन सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनचे संचालक आहेत.

नऊ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यअल्प आहे असे डॉक्टर यंग जून म्हणाले. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये करोनाची लागण होऊनही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्या वयोगटात इंडेक्स रुग्ण शोधून काढणे कठिण गेले.

 

News English Summary: South Korean epidemiologists have concluded that coronavirus infection is less common outside the home but more likely to be contracted by members of the household.

News English Title: People Are More Likely To Contract Covid 19 At Home Study Finds News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x