27 April 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांची उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक

Galvan Valley, India China, Colonel Santosh Babu, Wife Dy Collector, Telanga Government

हैदराबाद, २२ जुलै : सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचं पत्र दिलं. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागातच त्यांनी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी या आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह आणि ३ वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहत आहेत. दरम्यान, त्यांना तेलंगण सरकारनं सरकारी नोकरी देत त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बाबू यांच्या सन्मानार्थ तेलंगण सरकारनं त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रूपये देण्याची घोषणाही केली होती.

गेल्या महिन्यात, गालवान खोऱ्यात चीनच्या बेकायदेशीर व्यापाराबाबत भारत आणि चीनच्या सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह सैन्यातील एकूण २० जवान शहीद झाले. या चकमकीत कमीतकमी ४३ चिनी सैनिक आणि अधिकारीही मारले गेले. खरंतर कर्नल संतोष बाबू सतत तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी सैनिकांसोबत बोलणी करत होते. पण परत येत असताना चिनी सैनिकांनी त्यांच्यावर फसवणूक करत हल्ला केला, त्यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली.

 

News English Summary: There were violent clashes between Indian and Chinese troops. Meanwhile, Colonel Santosh Babu was martyred in the encounter. After this, the Telangana government has given a government job to Santosh Babu’s wife Santoshi. He has also been given the responsibility of the post of Deputy Collector.

News English Title: Galvan Valley India China Standoff Colonel Santosh Babu Wife Dy Collector Telanga Govenrment CM Reddy News latest Updates.

हॅशटॅग्स

#Ladakh(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x