10 May 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

पुन्हा वाद! मंत्री एकनाथ शिंदेबाबत काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार

Shivsena Ministers,  Do Not Respect, Congress MLA, MahaVikas Aghadi

मुंबई, २२ जुलै : महाविकास आघाडीतील कुरबुरी कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. एक मिटल्यावर दुसरा वाद उफाळून येतं असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाही, तसेच त्यांच्या महत्वपूर्ण कामाच्या फाईल्स अडवून ठेवत असल्याबद्दल चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी उघडपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजी बोलून दाखविल्याने, आघाडीतील बेबनाव पून्हा समोर आला आहे. शिवसेना मंत्र्यांना समज द्यावी व कॉग्रेसच्या आमदारांचा सन्मान करावा अशी मागणी केल्याने आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे.

रविवार १९ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विदर्भातील महाविकास आघाडीसोबतच्या आमदारांसोबत चर्चा केली. यावेळी चर्चेत राजुराचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी उघड नाराजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखविली. नगरविकास मंत्री शिंदे काँग्रेसच्या आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत, कृपया त्यांना आमदारांचा सन्मान राखण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दुसरीकडे, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय नियुक्त्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. या नियुक्त्या करताना नितीन राऊत यांनी काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली नसल्याचं समोर आलं आहे. परस्पर करण्यात आलेल्या या नियुक्त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोध केला आहे. घटक पक्षांशी विचारविनिमय न करता नेमणुका केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या नेमणुका रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

महामंडळांचं वाटप प्रलंबित असताना उर्जा खात्याशी संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांच्या संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. नितीन राऊत यांनी महाविकासआघाडीमधल्या कोणत्याही पक्षाशी चर्चा न करता या नियुक्त्या केल्याची माहिती आहे. उर्जा खात्याचं राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असताना राऊत यांनी राज्यमंत्र्यांनाही याची कल्पना दिली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

News English Summary: Subhash Dhote, a Congress MLA from Rajura in Chandrapur, has openly complained to Chief Minister Uddhav Thackeray that Shiv Sena ministers in the Mahavikasaghadi government are not respecting Congress MLAs and are blocking their important work files.

News English Title: Shivsena Ministers Do Not Respect Congress MLAs Obstruct Work Files News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x