2 May 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

मुंबईमधील मृत्यूसंख्येतील वाढ आणि संसर्गाचे प्रमाण चिंताजनक - फडणवीस

Mumbai, Corona Virus, Covid19, Devendra Fadnavis

मुंबई २५ जुलै: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आहे. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

राज्यात आत्तापर्यंत २ लाख ७ हजार १९४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५५.५६ एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे करोना मृत्यूदर वाढतो आहे. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मुंबईतील चाचण्यांची संख्या कमीच आहे, याकडे लक्ष वेधताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, २३ जुलै २०२० पर्यंत मुंबईत ४ लाख ६२ हजार २२१ चाचण्या झाल्या आहेत, तर २३ जुलैपर्यंत पुण्यात ३ लाख ५४ हजार ७२९ चाचण्या झाल्या आहेत. अगदी १७ ते २३जुलै या आठवड्याचा विचार केला तर ४१ हजार ३७६ चाचण्या मुंबईत झाल्या आहेत तर याच कालावधीतील पुण्याच्या चाचण्या ८५ हजार १३९ इतक्या आहेत. याचाच अर्थ मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत.

 

News English Summary: Corona mortality is on the rise due to consistently low tests in Mumbai. Moreover, the rate of infection is also worrisome. Therefore, there is an urgent need to remove the limit on the number of tests and conduct a large number of tests, said Opposition leader Devendra Fadnavis.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis Wrote A Letter To Chief Minister Uddhav Thackeray About Corona Tests News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x