फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला तर उद्धव ठाकरेंचा घरी बसून राज्य कारभार सुरु

मुंबई, ४ ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरील आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘सामना’ दिलेल्या मुलाखतीत ते एकाच जागी बसून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या कारभार चालवण्याच्या निर्णयाचे समर्थन करतात. यामुळे ते किती अज्ञानी आहेत, हे जनतेसमोर आल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर आगपाखड केली.
यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही. मंत्रालयात केवळ अधिकारी बसून असतात. इतर कोणी मंत्रालयात जात नसेल तर ते कायमचं बंद करुन टाका. तसेही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि पूर्ण पगार मिळत नाही. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. एकूणच काम न करणे, हेच सरकारचे धोरण असल्याची आगपाखड यावेळी नारायण राणे यांनी केली.
याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर न पडता प्रशासन चालवायची प्रतिज्ञा केली आहे, अशी टीकाही राणे यांनी केली. याशिवाय, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवरूनही राणेंनी सरकारला लक्ष्य केले. निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने कोकणाला एका रुपयाची मदत केली नाही. यानंतर आता कोकणचे आराध्यदैवत असलेल्या गणपतीसाठीही लोकांना जाऊन दिले जात नाही. सरकारने लादलेल्या अटी योग्य नाहीत. राज्य सरकारने कोकणात येणाऱ्या लोकांसाठी केवळ एक दिवसाचा क्वारंटाईन कालवाधी ठेवावा. तसेच खासगी वाहनांनी जाणाऱ्यांना ई-पासची सक्ती करु नये, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.
News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray is trying to run Maharashtra by sitting in the eight-by-eight room on Matoshri. In an interview given in ‘Saamana’, he sat in one place and supported the decision to run the state through video conferencing.
News English Title: BJP leader MP Narayan Rane criticism CM Uddhav Thackeray over Corona virus situation News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL