7 May 2025 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

आज राज्यात ९,१८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २९३ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १० ऑगस्ट : आज दिवसभरात राज्यात ९ हजार १८१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात २९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण सतत वाढतं आहे. परंतु यात एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही सतत वाढतं आहे. आज एका दिवसात राज्यात ६ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मागील २४ तासात ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६८.३३ टक्के झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ९ हजार १८१ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा ३.४४ टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० रुग्णांच्या नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख १ हजार २६८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

News English Summary: Today, 9,181 new corona patients have been found in the state. In one day, 293 corona virus have died. The number of corona patients in the state is steadily increasing.

News English Title: 9181 New Covid19 Positive Cases 6711 Discharges And 293 Deaths Have Been Reported In Maharashtra Today News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या