3 May 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

रेल्वेमध्ये ४४९९ पदांवर भरती | कोणतीही परिक्षा न देता भरती | जाऊन घ्या माहिती

Railway recruitment board, Staff Selection, MPSC Exams, UPSC Exams

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट: रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र, यात आणखी 432 जागा वाढल्या असून विभागही बदलला आहे. स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, आरएसी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर अशा विविध ट्रेडसाठी ही भरती काढण्यात आली असून एकूण जागा आता 4931 झाल्या आहेत. य़ा भरतीची महत्वाची बाब म्हणजे कोणतीही परिक्षा न देता 10 वी पास ते आयटीआय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी कंपन्यांची पुरती वाट लागली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावार गदा आली आहे. अशात सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते बेरोजगारांसाठी वरदान ठरू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत लाखावर सरकारी जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता भारतीय रेल्वेनेही कंबर कसली असून 4931 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एनएफआर (Northeast Frontier Railway) डिव्हिजनमध्ये ही 4499 भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर South East Central Railway Apprentice Recruitment 2020: साउथ ईस्ट सेंट्रल रेलवे (SECR)च्या विलासपूर विभागात 432 पदांवर भरती काढण्यात आली आहे. यासाठी 30 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. NFR RRC Recruitment 2020 साठी अर्ज करण्याची लिंक बातमीच्या अखेरीस देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

महत्वाच्या तारखा..
ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 16 ऑगस्त 2020.
अंतिम तारीख- 15 सप्टेंबर 2020

शिक्षण:
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कमीतकमी 50 टक्के गुण असावेत. शिवाय सोबत आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा.

वयाची अट:
RRC Recruitment 2020 साठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षणासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. 1 जानेवारी 2020 नुसार वय पाहिले जाणार आहे. एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य़ वर्गांसाठी 100 रुपये शुल्क आहे.

 

News English Summary: The 4499 will be recruited in the NFR (Northeast Frontier Railway) division. An official notification has been issued by the Railway Recruitment Cell (RRC) for this recruitment. Accordingly, the application process has been started from August 16.

News English Title: Railway recruitment board selection without examination total post 4931 News latest updates.

हॅशटॅग्स

#RailwayRecruitment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x