4 May 2024 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कर्नाटकात मोदी-शहांचा मास्टरस्ट्रोक, 'पॉर्न' बघणाऱ्या 'त्या' तीन आमदारांना पुन्हां तिकीट

karnatak assembly in 2012, Porn

कर्नाटक : २०१२ मध्ये कर्नाटकच्या विधानसभेतच पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या त्या विवादित आमदारांना भाजपने पुन्हां तिकीट दिल्याचे समोर आलं आहे. देशात काय सुरु आहे याचं गांभीर्य सरकारला नसल्याचं त्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंग यांनी भाजपाला यावर लक्ष्य केले आहे.

पत्रकार नलिनी सिंग यांनी भाजपाला ट्विट करून लक्ष केलं आहे. देशभरात आधीच महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं थांबता थांबत नाहीत. त्यातील काही प्रकरणात तर भाजपचे आमदारच आरोपी आहेत. त्यात भाजपने कर्नाटक निवडणुकीची चौथी यादी जाहीर केली असून, त्यात पुन्हा त्या तीन आमदार आणि मंत्र्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

नेमकं काय होत ते २०१२ मधील प्रकरण;

२०१२ मध्ये कर्नाटकात भाजप सत्तेत होती. त्यावेळी भाजपचे आमदार आणि मंत्री लक्ष्मण सावादी विधानसभेतील कामकाज चालू असतानाच मोबाईलवर पॉर्न बघत होते. त्यावेळीच कर्नाटकचे तत्कालीन पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमर आणि महिला व बालविकास मंत्री सी. सी. पाटील हे सुद्धा लक्ष्मण सावादी यांच्या सोबत विधानसभेतच पॉर्न व्हिडिओ पाहू लागले. त्यावेळी कर्नाटक विधानसभेत दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरु होती.

त्यावेळी उपस्थित पत्रकारांच्या ते नजरेत आलं आणि ते कॅमेऱ्यात कैद करण्यात आल होत. त्यानंतर कर्नाटकात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं होत. त्यानंतर मंत्री लक्ष्मण सावादी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमर हे मला मोबाईलवर युरोपियन देशात एका महिलेवर झालेल्या गॅंगरेपचा व्हिडिओ दाखवत होते, परंतु तो पॉर्न व्हीडीओ नव्हता असं न पटणार स्पष्टीकरण दिल होत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x