30 April 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

बिहार निवडणूक २०२० पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार

Coronavirus, Supreme Court, Reject Petition, Postpone Bihar Assembly Election 2020

नवी दिल्ली, २८ ऑगस्ट : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूक पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. जोपर्यंत बिहार राज्य करोनामुक्त होत नाही तोपर्यंत निवडणूक घेतली जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावताना अपरिपक्व असल्याचं म्हटलं.

न्यायाधीश अशोक भूषण यांनी याचिका फेटाळताना सांगितलं की, “निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कोविड आधार असू शकत नाही. मुख्य म्हणजे अद्याप निवडणुकीची सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ही याचिका गैरसमजातून करण्यात आलेली असून तिला दाखल करुन घेऊ शकत नाही”.

चालू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानुसार, बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील निवडणुका थांबवता येणार नाहीत. तसेच, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत दखलही देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. जोपर्यंत निवडणूक आयोग याबाबत काही अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत न्यायालयाकडून यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडून सावधानता बाळगतच पाऊल उचलेल. त्यामुळे ही याचिका प्रीमॅच्यूअर असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: The Supreme Court has dismissed a public interest litigation seeking postponement of Bihar Assembly Elections to be held in October-November citing the coronavirus crisis. The court expressed confidence that the election commission must be considering all aspects before taking the decision to hold polls.

News English Title: Coronavirus Supreme Court Reject Petition Demanding Postpone Bihar Assembly Election 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x