29 April 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

Health First | २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना करेल काळे | घरगुती रामबाण उपाय

White hairs, black hairs, Health and Fitness, Health Science

आजच्या या धावपळीच्या जीवनात आपले चुकीचे खाणे पिणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो. त्यात आपण कसे दिसतो, काय खातो याकडे आपले दुर्लक्ष होते. परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हवेतील प्रदूषण व जंक फूडचे वारंवार सेवन यामुळे आधीच आपली त्वचा व केस यावर विपरीत परिणाम होत असतो.

आपली त्वचा रुक्ष व केस कमजोर होतात. ते गळायला लागतात. तेव्हाही आपण काही उपाय करत नाही. पण जेव्हा आपल्या चेहर्‍यावर सुरकुत्या व केसात पांढर्‍या बटा दिसायला लागतात व त्यामुळे लवकरच आपण म्हातारे झाल्यासारखे दिसायला लागतो. अशातच आपण जर केसांबद्दल बोललो, तर आजकाल पांढर्‍या केसांची समस्या ही सर्वसाधारण झाली आहे.

परंतु, असे कितीतरी लोक आहेत, जे या समस्येवर उपाय शोधत असतात. कोणी वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरतात, कोणी मेंदी लावतात तर कोणी डाय लावून पांढरे केस लपवतात. पण असे करण्याची काही गरज नाही. तुमच्या याच समस्येवर उपाय आहे आणि तुम्हा लोकांसाठी खास आम्ही या लेखात एक उत्तम उपाय सुचवणार आहोत, ज्याच्या वापरामुळे तुमचे केस काळे होतील. जर तुम्ही केसांच्या समस्याने त्रस्त असाल, तर हा उपाय जरूर करून बघा. अगदी स्वस्त व झटपट होणारा हा उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय, जो पांढरे केस काळे करेल- काय आहे ही घरगुती जादू चला बघूया.

आज आम्ही तुम्हाला तुरटी बद्दल माहीती देणार आहोत. तुरटीमध्ये बरेच गुणधर्म समाविष्ट आहेत. ज्यात मग्नेशियम सल्फेट सगळ्यात जास्त असते. जे आपल्या शरीरातील ३०० पेक्षा जास्त शरीरातील एंझाइमला नियंत्रित करते. जर तुम्हाला याचा उपयोग करायचा असेल, तर गुलाबपाणी आणि तुरतीची आवश्यकता आहे. चला तर मग, जाणून घेऊया याचा उपयोग कसा करायचा.

हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्हाला तुरटी व गुलाबपाणी याची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिले, तुम्ही तुरतीची पाऊडर करून घ्या. मग गुलाबपाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. नंतर ती पेस्ट तुमच्या पांढर्‍या केसांना लावा. जर आठवड्यात तुम्ही २ ते ३ वेळा ही पेस्ट लावलीत, तर तुमचे पांढरे केस काळे होऊ लागतील.

 

News English Summary: Your skin becomes dry and hair becomes weak. They start to leak. Even then, you do nothing. But when wrinkles appear on your face and white bumps appear in your hair, it soon makes you look old. Similarly, if we talk about hair, then the problem of white hair has become common nowadays.

News English Title: How to make white colors black with home made treatment News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x