29 April 2024 6:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही | पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय - संजय राऊत

First Brahmin CM, Shiv Sena MP Sanjay Raut, BJP Leader Devendra Fadanvis, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मिळालेली स्थगिती कशी उठवली जावी, यावर मंथन सुरु आहे. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केला होता. आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई सुरु असताना फडणवीसांना आताच जात का आठवली? असा प्रश्न विचारला जात आहे अशी चर्चा सुरु झाली होती.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर, आता विरोधकांकडून सरकारवर आणि सरकारकडून विरोधकांवर चिखलफेक सुरु आहे. मात्र आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट केलं जात असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. कोर्टात बाजू मांडू नये, असं फडणवीस सरकारनं सांगितलं होतं. त्यामुळं हायकोर्टात युक्तीवाद केला नाही, असा गौप्यस्फोट काही दिवसांआधीच महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. तिथूनचं फडणवीसांवर टीका सुरु झाली.

मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेनेने भाष्य केले आहे. महाराष्ट्र कधीही जातपात धर्म पाहत नाही, महाराष्ट्राने मुस्लीम मुख्यमंत्री दिलेला आहे, अल्पसंख्याक मंत्री दिले आहेत. पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या रुपाने बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता. त्यामुळे असा आरोप करणं चुकीचा आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena has commented on the allegation of Devendra Fadnavis. Maharashtra never sees caste religion, Maharashtra has given Muslim Chief Minister, has given minority ministers. The first Brahmin was given by Balasaheb Thackeray in the form of Manohar Joshi. Therefore, MP Sanjay Raut has slammed Fadnavis saying that it is wrong to make such an allegation.

News English Title: First Brahmin CM given by Shiv Sena MP Sanjay Raut slam BJP Devendra Fadanvis over Maratha issue Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x