14 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी - चंद्रकांत पाटील

Interview Saamana Newspaper, Match fixing, BJP State President Chandrakant Patil

पुणे, २६ जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली. ‘चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहे. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले.

‘महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहे. एक जे ‘मातोश्री’वर बसून काम करत आहे. आणि दुसरे हे राज्यभर फिरत आहे’, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता पाटील यांनी टोला लगावला. ‘सातवीच्या मुलाला सध्याच्या राजकीय स्थितीवर निबंध लिहायला सांगितला तरी ते लिहितील. सरकार जाणार नाही हे कार्यकर्त्यांना निश्वास देण्यासाठीच वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहे. मुळात तिघे ही भांडतात, मग परत काहीच झाल नाही अस सांगतात’, अशी टीकाही पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने आहे. गेल्या काही दिवसांत शरद पवार यांनी राज्याच्या अनेक भागांचे दौरे केले आहेत. कालदेखील त्यांनी औरंगाबादमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून तातडीने निर्णय घेणे जास्त गरजेचे असल्याचे म्हटले होते.

 

News English Summary: Four months later, Uddhav Thackeray has given an interview to the match. So match fixing is here. Uddhav Thackeray has come before the media after Corona’s condition. Basically, Sanjay Raut is a praiser of Thackeray.

News English Title: Interview given to Saamana Newspaper is the match fixing said BJP State President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x