1 May 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

२४ तासांत ८३,३४७ नवे कोरोना रुग्ण | तर १,०८५ रुग्णांचा मृत्यू

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर : जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने अद्यापही वाढतच आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातही सोमवारी तब्बल ३२ हजारांच्या वर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये २२ टक्क्यांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर १७ टक्के रुग्णांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर तर १४ टक्क्यांसह ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. ७ जुलैपर्यंत भारतामध्ये १ कोटी टेस्ट करण्यात आल्या.

जगभरात दहा लाख लोकांमागे १२३ मृत्यू होतायत. भारतात दहा लाख लोकांमागे ६४ मृत्यू होतायत. गेल्या चार दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या केल्या जाणाऱ्या कोरोनाच्या टेस्ट या भारतात तयार झालेल्या किटसमधूनच होतायत. मास्क लावण्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करत आहेत.

 

News English Summary: India’s coronavirus tally crossed the 55-lakh mark on Tuesday on account of 75,083 new cases in the last 24 hours. Death toll from the virus in India has increased by 1,053 to reach 88,935, as per the latest updates. Stay with TOI for live updates

News English Title: Indias Covid19 Case Tally Crosses 56 Lakh Mark Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x