2 May 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन | मोदींकडून शोक व्यक्त

Union railways minister Suresh Angadi, passes away, Covid19, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.

सुरेश अंगडी यांना 11 सप्टेंबर रोजी असिम्प्टेमेटिक कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, आज (23 सप्टेंबर) वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला.

सुरेश अंगडी हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. ते 2014 पासून कर्नाटकमधील बेळगाव येथून खासदार म्हणून निवडून येत होते. 2019 मध्ये त्यांच्याकडे मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. ते संसदीय समितीचे अध्यक्षही होते.

त्यांच्या राजकीय कारकीर्तीची सुरुवात अगदी स्थानिक पातळीपासून झाली. 1996 मध्ये त्यांच्याकडे बेळगाव भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1999 पर्यंत त्यांनी या पदावर काम केलं. त्यानंतर 2001 मध्ये त्यांना बेळगाव भाजपचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं.

 

News English Summary: Minister of state for railways, Suresh Angadi, died due to the coronavirus disease (Covid-19) on Wednesday. He was 65. Prime Minister Narendra Modi joiend a host of political leaders and Unioon ministers in paying tributes to Angadi.

News English Title: Union railways minister for state Suresh Angadi passes away due to Covid19 Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x