13 May 2025 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | पीएसयू शेअर फोकसमध्ये, बुलेट ट्रेनच्या गतीने मिळेल रिटर्न, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC Rama Steel Share Price | 11 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीला तुफान गर्दी, मोठी संधी, टार्गेट जाणून घ्या - NSE: RAMASTEEL CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK
x

मी २०१९ मध्ये पंतप्रधान बनू शकतो: राहुल गांधी

कर्नाटक : २०१९ मधील लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी पंतप्रधान बनू शकतो असं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी प्रथमच जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.

आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी असं उत्तर दिल आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप कडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट आहे, परंतु काँग्रेस कडून कोणाचेच नाव पुढे आले नव्हते.

पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि ‘आरएसएस’कडून देशातील सर्व संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नं केले जात आहेत आणि काँग्रेसने त्यांचे प्रयत्नं हाणून पाडले आहेत असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं.

भाजपने भ्रष्टाचारी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचं तिकीट दिल आहे. तसेच पंतप्रधानांना स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार का मिळाला नाही ? याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रेड्डी ब्रदर्सना तिकीटं का देण्यात आली आहेत. त्याच रेड्डी ब्रदर्सनी करोडोचा घोटाळा करत त्यांनी सामान्यांचे पैसे लुटले असताना भाजपने त्यांना उमेदवारी कशासाठी दिली आहे असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला.

२ कोटी रोजगार निर्माण करण्याचं नरेंद्र मोदींच आश्वासन फोल ठरलं असल्याने त्यांनी तरुणांना त्याच स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते तर नरेंद्र मोदींचे सरकार का देऊ शकत नाही असा प्रश्न सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या