जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला | शिवसेनेकडून इशारा

मुंबई, २८ ऑक्टोबर : सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या अमेय खोपकर यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,” असं अमेय खोपकर म्हणाले.
दरम्यान, या वादात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी जानला या स्पर्धेतून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ‘बिग बॉस’च्या 14व्या पर्वाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागांत त्यात सहभागी असलेली स्पर्धक दुसऱ्या प्रतिस्पर्ध्या सोबत मराठी भाषेत संवाद साधत असताना अत्यंत मुजोर, मराठी द्वेष्टा जान कुमार सानू नावाच्या प्रतिस्पर्ध्याने तिला तू मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल, असे सांगत अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर, मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.
News English Summary: Shivsena MLA Pratap Saranaik has demanded that Jan Kumar Sonu should be excluded from the contest. In one of the recently aired episodes of the 14th episode of ‘Bigg Boss’, the contestant was communicating in Marathi with another contestant. The Marathi language has been insulted by shouting. Shiv Sena spokesperson MLA Pratap Saranaik has given a stern warning to Colors channel that if the Colors channel does not expel Mujor Jan Kumar Sanu from the series, then Shiv Sena will come on set and agitate in its own way.
News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik demands eliminate Jaan Kumar Sanu from Bigg Boss News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH