30 April 2024 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा
x

मराठी फेरीवाल्याच्या नोटा फाडणारे सोमय्या 'नॉट रिचेबल'

मुंबई : मुलुंडचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जनसंपर्क अभियानादरम्यान एका मराठी फेरीवाल्याशी झालेल्या वादात चिडून त्यांनी त्या मराठी फेरीवाल्याला धक्काबुक्की केली तसेच त्याच्या हातातील ५० रुपयांच्या नोटा फाडून टाकल्याला आणि त्याच्याच तोंडावर फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.

त्यानंतर खासदार किरीट सोमैय्या यांच्या विरोधात नवघर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून त्याला प्रतिउत्तर म्हणून सोमय्या यांनी सुद्धा फेरीवाल्याविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे.

मुलुंड मधील संभाजीराजे मैदानात भाजपच्या नगरसेविकेमार्फत स्केटिंग ट्रॅक बांधण्याच्या तसेच मैदानातील काही भागाच सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्या बांधकामांविरोधात न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. संभाजीराजे मैदानात ‘मैदानाचा बळी का घेतला जातो आहे, स्केटिंगची आम्हाला गरज नाही’, अशा अनेक प्रश्नांनी किरीट सोमय्या यांना स्थानिक नागरिकांनी भंडावून सोडले होत.

त्याच प्रश्नोत्तराचा दरम्यान त्यांना नागरिकांनी परिसरातील फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली. त्याचदरम्यान सचिन खरात नावाच्या आंबेविक्रेत्याकडून एक स्थानिक महिलाने आंबे विकत घेतल्याचे १५० रुपये देत असताना किरीट सोमैय्या यांनी ते पैसे हिसकावून घेतले त्यातील २० आणि १० रुपयाच्या नोटा हातातून खेचून घेत त्या फाडून टाकल्या आणि नंतर फेरीवाल्याला धक्काबुक्की सुद्धा केली. पुन्हा इथे फळे विकण्यास मनाई करत किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सचिन खरात यांच्यावर १२५० रुपयांचा दंड ठोठावला गेला. त्यानंतर सचिन खरात यांनी सुद्धा किरीट सोमैया यांनी मेहनतीचे पैसे फाडल्याची तक्रार नोंदवत त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४२७ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याची माहिती परिमंडळ ७चे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली आहे.

एका मराठी फेरीवाल्यावर किरीट सोमैय्या धावून गेल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच सोमय्या ‘नॉट रिचेबल’ झाले असून, त्यांनी त्यांचा मोबाइल फोन एका कर्मचाऱ्याकडे दिल्याचे त्यांच्या कार्यालयातून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x