27 April 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
x

सेना 'एनडीए'त राहायचं की नाही हा निर्णय घेण्यास स्वतंत्र: अमित शहा

लखनऊ : शिवसेना ‘एनडीए’त राहायचं की नाही तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

आम्ही २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहोत. परंतु स्वतः शिवनेचीच जर एनडीए मध्ये राहण्याची इच्छा नसेल तर ते त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचं मत अमित शहा यांनी मांडल.

शिवसेना हा आमचा जुना मित्र आहे आणि शिवसेना एनडीएपासून दूर जाऊ नये असं आम्हाला वाटतं. पण जर त्यांची तयारी नसेल तर त्यांनी निर्णय घ्यावा असं बोलून युतीबाबतचा निर्णय त्यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलवला. परंतु जर आगामी लोकसभा निवडणुकीत जर उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र आले तर भाजपसाठी मोठा आवाहन असेल असं त्यांनी मान्य केलं.

आगामी निवडणुकीत आंध्रप्रदेश, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल असं मत त्यांनी मांडलं. तसेच २०१४ मध्ये सुद्धा अनेक पक्ष भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढले होते तरी विजय भाजपचा झाला होते हे त्यांनी लक्ष्यात आणून दिल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x