7 May 2024 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

आम्हाला महाविकास आघाडीची ताकद समजली | पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू - फडणवीस

MahaVikas Aghadi, Devendra Fadnavis, BJP

पुणे, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय (MahaVikas Aghadi Victory) झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू” (We understood power of MahaVikas Aghadi and next time we will contest election with new strategy).

दुसरीकडे ‘हिंमत असेल तर एकट्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढा’ असं आव्हान देणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधानं करण्याचा लौकिक आहे. त्यांना यावेळच्या परिस्थितीचा अंदाज होता, म्हणूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यासाठी सोयीचा मतदारसंघ स्वीकारला,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has said that the result of the Assembly elections was different than expected. Devendra Fadnavis said, “The result of the Legislative Council is different than expected. We expected good seats, but only got one. The BJP leaders and activists had worked hard to analyze the results. But our strategy may have gone wrong. Also, since the three parties came together, we misjudged their strength. Now we understand their strength. Accordingly, we will prepare for the next elections.

News English Title: We understood power of MahaVikas Aghadi said Devendra Fadnavis after election result news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x