29 April 2024 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

विनायक मेटे साहेब फोर्ड गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन | आता उधारी द्या | जाहिरातच छापली

Beed Lokasha newspaper, Vinayak Mete, Pending advertising bills

बीड, ६ डिसेंबर: उधारीचा पर्याय हा अनेक उद्योगांच्या डबघाईला जाण्याचं कारण ठरतो. त्यात राजकीय नेत्यांवर भरोसा ठेऊन उधारीने उद्योग रेटने म्हणजे विषाचीच परीक्षा घेण्यासारखं आहे. तसाच एक उदाहरण समोर आलं असून, राजकीय नेत्यांसोबत कधीही उधारी करून व्यवसाय करू नये असंच तुम्ही देखील म्हणाल.

भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या धनवान पक्षाचे समर्थक आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या बाबतीत वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांना हा अत्यंत कटू अनुभव आला आहे. अगदी लाखो रुपयांची आलिशान फोर्ड गाडी घेण्यास विनायक मेटे यांच्याकडे पैसे आहेत, मात्र संबंधित वृत्तपत्रात केलेल्या जाहिरातबाजीचे पैसे द्यायला खिसा रिकामा असावा असंच म्हणावं लागेल. एनेकवेळा मागून देखील विनायक मेटेंनी पैसे न फेडल्याने संबंधित वृत्तपत्राने अखेर स्वतःच त्यांच्या उधारीची जाहिरात दिली आणि विनायक मेटे यांचं आलिशान फोर्ड गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन देखील केलं आहे.

शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्याकडील जाहिरातीची उधारी वसूल करण्यासाठी बीड जिल्ह्यातील लोकाशा या वृत्तपत्रानं थेट जाहिरातच छापली आहे. लोकाशाने छापलेल्या बातमीनुसार दिवाळी अंक 2017, 2018 आणि 2019च्या वर्धापनदिनाला आमदार मेटे आणि त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी जाहिरात दिली होती. त्याचे पैसे अद्याप दिले नसल्याचं या बातमीमधून सांगण्यात आलं आहे. जाहिरातीचे पैसे मागण्यासाठी थेट बातमी छापण्याचा हा प्रकार राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित वृत्तपत्राने छापलेल्या बातमीमध्ये एका फोर्ड गाडीचा फोटो देण्यात आला आहे. ही गाडी विनायक मेटे यांची असल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘सर्वप्रथम आपण फोर्ड कंपनीची गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन. आपण शून्यातून विश्व निर्माण केले याबाबत जनतेला नेहमीच कौतुक राहिले आहे. गावातून मुंबई जिंकण्याची किमया आपण गेली 25 वर्षे साधत आहात. त्याचेही विश्लेषण करता येईल. मात्र, आजचे प्रयोजन आपल्याकडील उधारी मागण्याचे आहे. महाराष्ट्राचा डोलारा सांभाळताना आपल्याला आठवण राहिली नसेल किंवा आम्हीच आपणास आठवण करुन देण्यास कमी पडलो असू. म्हणून आपल्याला आज जाहीर आठवण करुन देत आहोत’, असं या बातमीमध्ये छापण्यात आलं आहे. या बातमीप्रमाणे विनायक मेटे यांच्याकडे 77 हजार रुपये, तर त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांच्याकडे 20 हजार रुपये उधारी बाकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

News English Summary: In the case of Vinayak Mete, a supporter of a big rich party like the Bharatiya Janata Party and a leader of the Shiv Sangram organization, the journalists running the newspaper have had a very bitter experience. Vinayak Mete has the money to buy a luxury Ford worth lakhs of rupees, but it has to be said that his pocket should be empty to pay for the advertisements in the respective newspapers. As Vinayak Mete did not pay even after many times, the concerned newspaper finally advertised his loan himself and also congratulated Vinayak Mete for taking the luxurious Ford car.

News English Title: Beed local Lokasha newspaper publishes news on leader Vinayak Mete regarding pending advertising bills News updates.

हॅशटॅग्स

#VinayakMete(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x