5 May 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लोटसचं ऑपरेशन सुरु | भाजपचे मोठे सहकारी पक्ष शरद पवारांच्या संपर्कात?

Rashtriya Samaj Party, Mahadev Jankar, NCP President Sharad Pawar

पुणे, ८ डिसेंबर: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षासोबत त्यांच्या मोठ्या सहकारी पक्षांची देखील चिंता वाढली आहे. जेथे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला सांभाळून घेतलं नाही तेथे आपला निभाव काय लागणार अशी चिंता सहकारी पक्षांना देखील लागली असावी. महाविकास आघाडीचा देखील आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळत आहे. एका धक्क्यातून भारतीय जनता पक्ष सावरण्याआधीच पवार नीती काम करू लागल्याने ‘लोटसचं ऑपरेशन सुरु’ झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.

कारण भारतीय जनता पक्षातील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Former Minister Mahadev Jankar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची गुप्त भेट बराच वेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती प्रसार माध्यमांकडे आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या 3 डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यामुळे बऱ्याच वेळ चर्चा झाली. परंतु, ही भेट कशासाठी होती आणि चर्चेचा सविस्तर तपशील काय होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. त्यानंतर बीडमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी जाहीरपणे भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 

News English Summary: Former Minister Mahadev Jankar, leader of the Rashtriya Samaj Party (RSP), a constituent party of the Bharatiya Janata Party (BJP), has reportedly had a secret meeting with NCP President Sharad Pawar. Mahadev Jankar will meet Sharad Pawar at VSI Institute near Pune. The two leaders had a long discussion.

New English Title: Rashtriya Samaj Party President Mahadev Jankar meet NCP President Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x