2 May 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये
x

अण्णा दिल्लीत जाऊन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनच्या तयारीत | भाजप नेत्यांची धावाधाव

BJP leader Haribhau Bagde, Anna Hajare, Farmers Protest

राळेगणसिद्धी, २२ डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा (२२ डिसेंबर) २७ वा दिवस आहे. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा दिल्लीत जाऊन केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्ये मात्र चिंतेचे वातावरण झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची भारतीय जनता पक्षाने धास्ती घेतल्यानेच या भेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

दरम्यान काल राळेगणसिद्धीमध्ये पंजाबचे शेतकरी अण्णांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी अण्णांशी चर्चा केली. यावेळी अण्णांनी शेतकरी आंदोलनाला आपला आधीपासूनचं पाठिंबा असल्याचं सांगतानाच आंदोलकांना बळ देण्यासाठी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासनही दिलं होतं. अण्णांनी दिल्लीत आंदोलन केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्यानेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अण्णांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचं कळतय .

 

News English Summary: Senior social activist Anna Hazare has also decided to go to Delhi and protest against the Centre’s agricultural laws. So now there is an atmosphere of concern in the Bharatiya Janata Party. Senior Bharatiya Janata Party leader Haribhau Bagade visited Ralegan Siddhi and held discussions with Anna. The Bharatiya Janata Party (BJP) has started talking about Anna’s agitation.

News English Title: BJP leaders meet Anna Hajare after his commitment to protesting farmers at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x