30 April 2024 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी फडणवीस सरकारने खडसेंना क्लीन चिट दिली होती....मग?

Fadnavis government, Clean chit, Eknath Khadse, Bhosari Land scam case

मुंबई, २६ डिसेंबर: तत्कालीन भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली होती. मे २०१८ च्या सुरुवातीलाच तसा अहवालच एसीबीने न्यायालयात सादर केला होता.

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असताना खडसेंना क्लीन चिट देण्यात आली होती. पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होत. त्याप्रकारचे चौकशीचे आदेश पुण्याच्या एसीबी कडे देण्यात आले होते. महसूल मंत्री असताना त्यांनी पदाचा गैर वापर करत भिसारी एमआयडीसी येथे भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पुणे एसीबीने मे २०१८ मध्ये न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला होता आणि सदर प्रकरणाची चौकशी करत त्या भूखंड खरेदीमुळे राज्य शासनाचा महसूल बुडाला नसून, तसेच त्यात एकनाथ खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही असं नमूद करण्यात आलं होतं. त्या अहवालामुळे एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा होता. परंतु संपूर्ण प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आम्ही त्याबद्दल अधिक बोलणार नाही, असं एसीबीचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी प्रसार माध्यमांना स्पष्टं केलं होतं. ज्याअर्थी फडणवीस यांच्या सरकारनेच त्यांना क्लीनचिट दिली होती. मग आता ईडीने नेमकं प्रकरण पुढे केलं आहे याची चर्चा सुरु झाली आहे.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘खडसेंच्या विरोधात सर्व पुरावे असताना त्यांना क्लीन चिट कशी मिळू शकते?,’ असा सवाल त्यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सर्वांनाच क्लीन चिट देत आहेत. त्यातलाच हा प्रकार तर नाही ना? अशी शंका उपस्थित करतानाच एसीबी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला होता.

दरम्यान ईडीला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. जर त्यांनी ED लावली तर मी CD लावेन असा इशारा एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता.

 

News English Summary: Former BJP leader and revenue minister Eknath Khadse was given a clean chit by the Bribery Prevention Department in the Bhosari plot purchase case in Pune. The same report was submitted to the court by the ACB in early May 2018.

News English Title: Fadnavis government was given clean chit to Eknath Khadse over Bhosari Land scam case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x