7 May 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

रुपाली चाकणकरांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी | धमकी देणाऱ्याचं नाव सांगली संबंधित...

NCP leader Rupali Chankankar, Threatening call, Jayant Patil

पुणे, २६ डिसेंबर: एखाद्या गोष्टीत किंवा घटनेत किती योगायोग घडून येऊ शकतो याच एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. कारण धमकी प्रकरण रुपाली चाकणकर यांच्या संबंधित असलं तरी धमकी सांगलीतून आणि जयंत पाटील नावाच्या व्यक्तीकडून येणं हा निव्वळ योगायोग म्हणता येईल. पण अर्थात त्याचा कोणताही संबंध जलसंपदा मंत्री जयंत पाटील याच्याशी नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील कार्यालय पेटवून देतो अशा धमकीचा फोन जयंत पाटील याने चाकणकर यांना केला. दरम्यान आता या जयंत पाटीलला अटक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावाशी साम्य असलेल्या आणि सांगलीतीलच व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली.

काल सायंकाळी पाचच्या सुमारास रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयात धायरी येथील कार्यालय पेटवून देतो अशा धमकीचा फोन आला. मग हे प्रकरण चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी चाकणकर यांना सांगितले. अखेर या धमकी देणार्‍याचा छडा पोलिसांनी लावला असून सदर धमकी देणार्‍या इसमाचे नाव जयंत रामचंद्र पाटील असून तो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचा रहिवासी आहे.

चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना चाकणकर म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारचे राजकीय वैमनस्य नसताना अशाप्रकारे अर्वाच्य भाषा वापरणारा आणि कार्यालय पेटून देतो असे बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील.

 

News English Summary: Jayant Patil made a threatening phone call to NCP state president Rupali Chakankar’s office at Dhayari on Sinhagad Road. Meanwhile, Jayant Patil has been arrested. Rupali Chakankar’s office was threatened by a man from Sangli who was similar to the name of Jayant Patil, the NCP’s state president and water resources minister in the Mahavikas Aghadi government.

News English Title: NCP leader Rupali Chankankar got threatening call form Sangli based person naming Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x