मुंबई, २७ डिसेंबर: संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदावरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकारण रंगले आहे. यूपीएचे नेतृत्व कोण करणार? यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे, अशी ईच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे.

एवढेच नव्हेतर, याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीकादेखील केली आहे. या टीकेला काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावरून काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. “शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेनं सल्ला देऊ नये,” असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

 

News English Summary: Senior Congress leader Ashok Chavan says Shiv Sena is not part of United Progressive Alliance and tie-up between two parties is limited to Maharashtra only.

News English Title: Minister Ashok Chavan reply to Shivsena over UPA leadership news updates.

युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेनं सल्ला देऊ नये – अशोक चव्हाण