6 May 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

देशभरात कोरोनाची लस मोफत मिळणार - केंद्रीय आरोग्यमंत्री

Corona vaccine, free of cost, in India, Minister Dr Harsh Vardhan

नवी दिल्ली, २ जानेवारी: देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.

दिल्लीतील GTB रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मी आवाहन करतो आहे की कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. सुरक्षा आणि लसीची कार्यक्षमता सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे.”

 

News English Summary: An important announcement that all the people of the country will get the corona vaccine free of cost. Harshvardhan has done. Dry run for vaccination is going on all over the country and preparations for vaccination have started in the country. This was reviewed by Union Health Minister Dr. Taken by Harshvardhan. He later told the media that the corona vaccine would be available free of cost not only in Delhi but across the country.

News English Title: Corona vaccine will be provided free of cost in whole India said Union Health Minister Dr Harsh Vardhan news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x