4 May 2024 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मुंबई काँग्रेसनंतर राज्य काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार | भविष्यातील मोर्चेबांधणी

Congress, Balasaheb Thorat, resigns, Maharashtra president

मुंबई, ४ जानेवारी: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त होणार आहे. नवीन दिल्लीत पोहोचून थोरात यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन वर्षात काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होणार आहे. त्याचच एक भाग म्हणून बाळासाहेब थोरात हे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. बाळासाहेब थोरात हे दिल्लीत पोहोचले आहे. राजीव सातव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी संघटनेचे सचिव के.सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडण्याची शक्यता असून सातव, चव्हाण आणि पटोले यांच्यापैकी एका नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

 

News English Summary: In the first week of the new year, the winds of change are blowing in the Congress. State Revenue Minister and Congress state president Balasaheb Thorat will be relieved of his post. It is learned that Thorat has proposed his resignation from the post of state president after reaching New Delhi.

News English Title: Congress leader Balasaheb Thorat resigns as Maharashtra president at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x