8 May 2025 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

...मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Dhananjay Munde, Renu Sharma

मुंबई, २५ जानेवारी: आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायचा झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दररोज राजीनामा द्यावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत सध्या कृषी कायद्यांविरोधात मोठे आंदोलन सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेनंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच आज संजय राऊत यांनी सहकुटुंब ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगानं ही भेट झाली असावी, अशी चर्चा होती. मात्र, राऊत यांनी मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचं समोर येत आहे.

 

News English Summary: If he wants to resign after the allegations, Prime Minister Narendra Modi will have to resign every day, said Shiv Sena MP Sanjay Raut. There is a big agitation against agricultural laws in Delhi at present. This is a serious matter. Prime Minister Narendra Modi is being accused of this every day. Then he should resign every day, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut slams opposition over demand of Dhananjay Munde resignation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या