4 May 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

गावात सत्ता नाही, जिल्ह्यात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष | मुश्रीफ यांच्याकडून खिल्ली

Minister Hasan Mushrif, Chandrakant Patil, Gram Panchayat election

कोल्हापूर, १८ जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

कोल्हापूरला जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची मागणी करत आहेत. आता ग्राम पंचायत निवडणुकीत त्यांच्याच गावात शिवसेनेने सुरुंग लावला आहे.

गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनेने ९ पैकी सहा जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला आहे. महत्वाचे म्हणजे खानापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे.

दरम्यान, विषयाला अनुसरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. गावात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. त्याला संदर्भ होता अर्थातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा.

मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यात कायमच राजकीय खेचाखेची सुरू असते. आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

 

News English Summary: Minister Hasan Mushrif has slammed BJP state president Chandrakant Patil. There is no power in the village, there is no power in the district and what kind of state president is this? He was referring, of course, to the results of the Gram Panchayat elections.

News English Title: Minister Hasan Mushrif has slammed BJP state president Chandrakant Patil over Gram Panchayat election result in Kolhapur news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x