7 May 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
x

3113 ग्राम पंचायतींवर भगव फडकला | शिवसेना सर्वात मोठा पक्ष - सविस्तर वृत्त

Gram Panchyat Eelection 2021, Shivsena

मुंबई, १९ जानेवारी: महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ग्रामीण भागातील पहिल्याच मोठय़ा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जास्त जागा मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये वर्चस्व कायम राखले असले तरी भाजपशी संबंधित आघाडय़ांना राज्याच्या सर्व भागांमध्ये चांगले यश मिळाले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मूळ गावातील निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला बरोबर घेतले होते. पण त्यांच्या गावात शिवसेनेचा भगवा फडकला. तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजपला फटका बसला. या निकालानंतर लगेचच सर्वत्र सरपंचपदांच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू झाली.

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून एकीचं बळ दाखवून दिलं आहे. मात्र ग्राम पंचायत निवडणूक पक्ष पुरस्कृत, आघाडी पुरस्कृत गाव पॅनेलची. यामुळे येथे आमदार, खासदारांची पॅनेल उभी असतात. यामुळे विजय, पराजय हा त्या त्या आमदार किंवा पॅनलचा असतो. परंतू नंतर जेव्हा गोळाबेरीज केली जाते तेव्हा पक्षाचा विचार केला जातो.

यानुसार सत्ताधारी शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने 3113 ग्राम पंचायतींवर भगव फडकविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने 2632 ग्राम पंचायतींवर विजय मिळविला आहे. यानंतर राज्यात सत्तास्थापनेत आणि चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो. राष्ट्रवादीच्या पारड्यात 2400 ग्राम पंचायती आल्या आहेत. काँग्रेसने पहिल्या क्रमांकाचा दावा केला असला तरीही त्यांच्या पारड्यात 1823 ग्राम पंचायती आल्या आहेत. तर राज ठाकरेंच्या मनसेला 36 ग्राम पंचायती मिळाल्या आहेत. अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्यांना 2344 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. ही आकडेवारी आजतकने दिली आहे.

 

News English Summary: The ruling Shiv Sena has become the number one party. Shiv Sena has spread saffron on 3113 gram panchayats. The Bharatiya Janata Party is the second largest party with MLAs. The Bharatiya Janata Party has won 2632 gram panchayats. This is followed by the number of NCP members in power and in the state. The NCP has 2400 gram panchayats.

News English Title: Gram Panchyat Eelection 2021 Shivsena is the largest part with 3113 seats news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x