4 May 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
x

दत्तक नाशिकमध्ये भाजपसाठी भविष्यात धोक्‍याची घंटा ?

नाशिक : सत्ताधारी भाजपचा सध्या जरी नाशिकमध्ये २ खासदार, ४ आमदार, महापालिकेत सत्ता, जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य अशी ताकद आहे. परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ती ताकद केवळ कागदावरच असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपची नाशिकमधील लॉबी खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावून आपल्याच उमेदवाराला धूळ चारत असल्याचे चित्र समोर आलं होत.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सेनेला धडा शिकविण्यासाठी एनसीपीचे अधिकृत उमेदवार ॲड. शिवाजी सहाणेंना पाठिंबा दिला होता. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भाजपच्या नगरसेवकाशी संवाद साधत एनसीपीचे अधिकृत उमेदवार ॲड. शिवाजी सहाणेंना मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्याचा सरळ अर्थ म्हणजे सर्व समर्थक पक्षांची मतं मिळून ॲड. शिवाजी सहाणेंना ३५० पेक्षा अधिक मते मिळणं अपेक्षित होते. पण वस्तुतः त्यांच्या विरोधातील उमेदवार नरेंद्र दराडे यांना ३९९ मते पडली. त्यात नक्की कोणाची मतं फुटली ते अधिकृत पणे माहित नसले तरी सर्वाधिक भाजपची मते फुटल्याची चर्चा सुरु आहे. त्याचा अर्थ नाशिक मधले भाजपचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे आदेश सुद्धा धुडकावतात हे भविष्यात भाजमध्ये काय होणार याची चुणूक दाखवतात.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावून भाजपच्या अनेक प्रतिनिधींनी स्वतःला जे हवं ते केलं अशी चर्चा रंगली असताना, त्यात लगेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी स्वतःच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतापदादा सोनवणे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे विनंती वजा आदेश दिले. परंतु प्रतापदादा सोनवणे यांनी मुख्यमंत्र्याचे आदेश धुडकाविले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपला दुसऱ्यांदा झटका बसला आहे.

त्यामुळे मागील विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेत झालेली राजकीय ढगफुटी नजीकच्या काळात नाशिक भाजपमध्ये न झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मनसेमध्ये सुद्धा अनेक नेत्यांची घरवापसी होऊ शकते. कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे आदेश धुडकावून लावायला आता पासूनच जी सुरुवात झाली आहे ती भविष्यात काय स्वरूप घेऊ शकते याचा अंदाज स्थानिक पदाधिकाऱ्यांना आला आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे आदेश जुमानले जात नाहीत तर नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोण जुमानणार अशी चर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.

हॅशटॅग्स

#BJP Nashik(3)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x