4 May 2025 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

जर देशातील शेतकरी दहशतवादी असतील तर कंगना बुद्धिवान आहे | फराह खान'चा टोला

Farmers Protest, Terrorists, Kangana Ranaut, Farah Khan

नवी दिल्ली, ०३ फेब्रुवारी: मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. पण रिहानाच्या या ट्वीटवर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने टीका केली आहे.

रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे. त्यावर ट्वीट करत कंगनाने रिहानावर आणि शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये उत्तर देताना यासंबंधी कोणीही बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून दहशतवादी असल्याचं कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रिहानाच्या ट्विटमुळे भारतीयांमध्ये आता तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रिहाना नक्की कोण आहे हे जाणून घेताना तिच्या धर्माबद्दल भारतीय सर्वाधिक सर्च करत असल्याचे गुगल ट्रेण्ड्समधून दिसून येत आहे.

त्यानंतर फराह खानने देखील कंगनाला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना तिने म्हटलं आहे की, “जर देशातील शेतकरी दहशतवादी असतील तर कंगना रानौत बुद्धिवान आहे…जय हिंद (If the farmers of India are terrorists than Kangana Ranaut is an intellect said Farah Khan)

 

News English Summary: Farmers’ agitation has been going on in the country’s capital for the last two months. In Delhi, farmers have staged agitation against agricultural laws at various borders. In all this, world famous pop star Rihanna has tweeted from the farmers’ movement. In this tweet, Rihanna tweeted a news from CNN and wrote from the farmers’ movement, “Why don’t you think about it.” But Bollywood actress Kangana Ranaut has criticised Rihanna’s tweet.

News English Title: If the farmers of India are terrorists than Kangana Ranaut is an intellect said Farah Khan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या