4 May 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

२०२४ मधील निवडणुकीत भाजपला देशात ३० कोटी मतं मिळतील | प्रदेशाध्यक्षांचं विधान

Maharashtra BJP, 2024 Loksabha Election, Chandrakant Patil

मुंबई, १२ फेब्रुवारी: आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार असल्या तरी या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत असा दावा केला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदान घेऊन देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २२ कोटी मतदान झालं, या निवडणुकीत ३०३ जागा भाजपानं पटकावल्या. त्यामुळे आता पुढील २०२४ निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशात ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत असं विधान त्यांनी केले.

दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भारतीय जनता पक्षाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र काँग्रेस सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ यावेळी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जातो.देशात आज १६ ते ३५ वयोगटातील तरुणवर्गाची लोकसंख्या ६२ टक्के आहे. सोशल मीडियाचे महत्व ओळखून देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, शेतकरी वाचवण्यासाठी या मोहिमेत तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे”, असे आवाहनही केले आहे.

 

News English Summary: Although the next Lok Sabha elections will be held in 2024, it is seen that the Bharatiya Janata Party has already started its efforts for these elections. Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil, while addressing the party workers, has claimed that they want to win 30 crore votes and more than 400 seats in the coming 2024 elections.

News English Title: BJP will win with 30 crore votes in 2024 Loksabha Election said Maharashtra BJP president Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x