13 December 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल आल्यावर तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी...

Former MP Raju Shetti, Committee appointed, supreme court, Farm laws

कराड, १२ जानेवारी: नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती देऊन केंद्र सरकारला मोठा झटका दिला. पण कोर्टाने नेमलेल्या समितीमध्ये कृषी कायदे आणि सरकारच्या समर्थकांचाच समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अदानी, अंबानीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती घ्या आणि कायमचेच शेतकऱ्यांच्या बोकांडी हे कायदे बसवून देऊयात असे कोर्टाला म्हणायचे आहे का अशी शंका राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे, कराड येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्विटरवरुन न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात नाराजी व्यक्त केलीय. “न्यायालयाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. कायद्यांना स्थगिती देऊन आंदोलन मागे घ्या” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने नेमलेली समिती ही कायद्याचे समर्थन करणाऱ्यांची असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. “कायद्यांचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमली आहे. ते अदानी व अंबानींना सोयिस्कर होईल असा अहवाल देतील. तो (अहवाल) कायद्याच्या स्वरुपात तुमच्या बोकांडी बसवतो असंच कदाचित सर्वोच्च न्यायालया म्हणायचं असेल,” असंही शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

 

News English Summary: The Supreme Court today adjourned the implementation of new agricultural laws, dealing a major blow to the central government. But the committee appointed by the court is alleged to include only agricultural law and government supporters. Against this backdrop, Raju Shetti, while talking to reporters at Karad, questioned whether the court wanted to ask Adani and Ambani to amend the Agriculture Act and impose a permanent ban on farmers.

News English Title: Former MP Raju Shetti do not have trust on committee appointed by supreme court over farm laws news updates.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x