6 May 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरतेय म्हणजे भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय

P Chidambaram, Modi government, Disha Ravi

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी: दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग कथित ‘टूलकिट’ ट्विट केलं होतं. या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हाही दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्याच्या दहा दिवसानंतर पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक केली. दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिशाला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केलं. न्यायाधीश देव सरोहा यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे भरून आले. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा विरोध केला आहे. यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भारत मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे” अशा शब्दांत निशाणा साधला आहे.

पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला असल्याची घणाघाती टीका देखील चिदंबरम यांनी केली आहे. “जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे” असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

 

News English Summary: P. Chidambaram tweeted about it from his Twitter account. Chidambaram has also lashed out at India’s foundation, saying it has certainly been shaken. “If a 22-year-old student is a threat to the country, then India’s foundation is definitely shaken. A toolkit to support farmers has become more dangerous than Chinese troops infiltrating the Indian border,” Chidambaram said in his tweet. He also appealed to the youth to raise their voices against the dictatorial regime.

News English Title: P Chidambaram slams Modi government after arrest of Disha Ravi news updates.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x