7 May 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

तृतीयपंथीयांचा रस्त्यावर धुडगूस | वाहतूक पोलिसाला मारहाण | पोलिसांकडून अटक

Traffic police constable, six transgenders

मुंबई, १७ फेब्रुवारी: मुंबईत रहदारीच्या ठिकाणी धुडगूस घालण्याचे प्रकार काही जुने राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी एका महिलेने ट्राफिक पोलिसांच्या कॉलरला धरून त्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या महिलेला चांगलीच अद्दल घडवली होती.

त्यानंतर अजून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सहा जणांनी मिळून ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केली असून, त्याचा एक व्हिडिओ बनवला, त्यानंतर ट्रॅफिक हवालदाराने पंतनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्या चारही आरोपींना अटक करण्यात आलीय.

विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेले 38 वर्षांचे विनोद बाबुराव सोनवणे छेडानगर सब वे येथे ड्युटीवर असताना काल संध्याकाळी 6 ते 6.30 वाजताच्या दरम्यान एका रिक्षातून चार जण प्रवास करत होते. त्यावेळी ट्रॅफिक हवालदार विनोद सोनावणे यांनी त्यांच्या रिक्षा अडवली आणि रिक्षाचा फोटो काढला. विशेष म्हणजे रिक्षात बसलेले चारही जण तृतीयपंथीय होते. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रिक्षातून खाली उतरत ट्रॅफिक हवालदार विनोद सोनवणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 

News English Summary: A shocking incident has come to light in Ghatkopar Pantnagar police station where four third parties beat up a traffic policeman. The traffic constable was beaten up by six people and a video of him was made, after which the traffic constable lodged a case against them at the Pantnagar police station and all the four accused were arrested.

News English Title: Traffic police constable was beaten up by six transgenders news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x