1 May 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

कोरोना संदर्भात वृत्त पसरताच केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित्तीत पतंजलीचं कोरोनील औषध लाँच

Coronil medicine, Ramdev Baba, Patanjali, Coronil medicine

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी: योग गुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी कोरोनाचे औषध लॉन्च केले. त्यांचा दावा आहे की, हे औषध WHO सर्टिफाइड आहे. याचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले आहेत. या औषध लॉन्चिंगच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपर सादर केले.

यावेळी बाबात रामदेव म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आमची इच्छा आहे की, योग आयुर्वेदच्या रिसर्च बेस्ड मेडिसिनद्वारे आपला देश मेडिकल क्षेत्रात संपूर्ण जगाला लीड करावा. यामुळेच या औषधाला लॉन्च करण्यासाठी हा दिवस निवडला. याबाबत अनेक रिसर्च पेपर सादर झाले आहेत. कोरोनील लॉन्च केल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आयुर्वेदात रिसर्च केल्यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करतात.

योग गुरु रामदेव यांच्या पतंजली कंपनीने 23 जूनला कोरोनील औषधाला लॉन्च केले होते. या औषधाला कोरोना रुग्णावर ट्रायल केल्यानंतर लॉन्च केल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर वादंग उठल्यानंतर आयुष मंत्रालयाने 5 तासानंतर या औषधाच्या प्रचारावर बंदी घातली होती. 7 दिवसानंतर बाबा रामदेव माध्यमासमोर आले होते आणि त्यांच्या औषधावरील बंदी उठल्याचे जाहीर केले होते.

 

News English Summary: Yoga guru Baba Ramdev launched Corona medicine on Friday. They claim that the drug is WHO certified. There have also been clinical trials. The Union Minister Dr. Harshvardhan and Nitin Gadkari were present. This time he presented a scientific research paper on Corona’s First Evidence Based Medicine.

News English Title: Coronil medicine Swami Ramdev Patanjali corona virus Coronil medicine news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x