29 April 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Health First | घोळ मासा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे

Ghol fish, Tasty, beneficial to health

मुंबई, १६ मार्च: बेढब, जाडजूड आणि खवलेदार माशांच्या वाटेला मासेखाऊही फारसे जात नाहीत. म्हणूनच प्रत्येक मच्छीमार्केटमध्ये मोठी घोळ विकणाऱ्याच्या पाटीसमोर मोजकीच डोकी दिसतात. पण घोळीची व काट्याची चव चाखायची असेल तर एकदा तरी त्या पाटीकडे वळायलाच हवे.

घोळीचा आकार पाहता तो एका कुटुंबाने फस्त करण्याच्या आवाक्याबाहेरचा असल्यानेच मच्छीमार्केटमध्ये त्याच्या तुकड्याही मिळतात. किलोला ७०० ते ८०० रु. इतका त्याचा भाव. पण २०० ते ३०० रु.मध्ये चार जणांचे खवय्ये कुटुंब तळून व कालवण करून घोळीवर भरपेट ताव मारू शकतात.

घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो.

घोळ मासा खाण्याचे आरोग्यदायी फायदे:

  • घोळ माशातील डीएचए अ अणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे. सोबतच यामुळे रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते.
  • घोळ माशात ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीए आहे. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. मुबलक प्रमाणात ओमेगा 3 घटक असल्याने मेंदूच्या कार्याला, नसांना त्यांचा फायदा होतो.
  • त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे. अकाली चेहर्‍यावर सुरकुत्या पडण्याचा त्रास कमी होतो. त्वचा मुलायम राहते.
  • शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते.
  • घोळ माशातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते. दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते.
  • मसल्स टोन करण्यासाठी, त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारे शरीराला उत्तम प्रतीच्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.

 

News English Summary: Ghol fish is fleshy and less thorny, so it is very popular among carnivores. The middle thorn of this fish (the part of the spine) is eaten with great relish. Therefore, the fish which is tasty and very beneficial to health is sold at a higher price in the fish market.

News English Title: Ghol fish is tasty beneficial to health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x