27 April 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

तर ते भाजपमध्ये प्रवेश करणारे मुंबईचे दुसरे माजी पोलीस आयुक्त ठरतील?

Dr Satyapal Singh, Parambir Singh, BJP, Mumbai Police

मुंबई, २२ मार्च: सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदावर राहून सुरु असलेल्या हालचाली पाहता ते अचानक राजीनामा देऊन राजकरणात न उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात सचिन वाझे प्रकरणातील मूळ चौकशी सोडून संपूर्ण विषय अनिल देशमुख केंद्रित करण्याचा त्यांचा शिस्तबद्ध प्रयत्न सध्या बरंच काही सांगून जातोय. सचिन वाझे प्रकरणात सुरुवातीला मोठे IPS अधिकारांच्या NIA कडून चौकशा होणार अशा पुड्या सोडून त्यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या दबाव निर्माण केला गेला. त्यानंतर त्यांच्या हालचाली भाजपला पोषक असल्याचं दिसू लागलं आहे आणि NIA कडून सध्या ते किंवा IPS रडारवरून गायब झाल्याचं चित्रं आहे. त्यामुळे सध्या मिशन अनिल देशमुख सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण राजकारण स्फोटकं या विषयावरून हटवून अनिल देशमुख यांना केंद्रस्थानी ठेवण्याचे शिस्तबद्ध मिशन सुरु असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

आगामी काळात स्वतःची कातडी वाचवावी म्हणून दिल्लीतून कोणी हमी तर दिली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यानंतर त्यांच्या एकूण हालचाली आणि निर्णय एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे झाल्या आहेत असा निष्कर्ष लागू शकतो. उद्या मिशन तडीस गेल्यास ते अचानक राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील आणि थेट पंजाबच्या राजकारणात उतरवले जातील अशी शक्यता आहे.

तत्पूर्वी २०१४ मध्ये मेरठमध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची शंखनाद रॅली दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी अचानक राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. सत्यपाल सिंह यांनी खाकी सोडून खादीची कास धरण्याचं यापूर्वीचं जाहीर केलं होतं. आपल्याला रस्त्यावर उतरून समाजसेवा करायची असल्याने आपण राजकारणात उतरत असल्याचं सत्यपाल सिंह यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं. पण त्यांच्याबाबतीत असं काही घडलं नव्हतं जे परमबीर यांच्या बाबतीत सध्या घडत आहे.

त्यानंतर सत्यपालसिंह भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा झाली होती. अखेर ठरल्याप्रमाणे त्यांना भाजपने त्यांना उत्तर प्रदेशातील बागपत येथून उमेदवारी जाहीर केली होती. ते विजयी झाले होते आणि विशेष म्हणजे त्यांना २०१४ मधील विजयानंतर मंत्रिपद देखील देण्यात आलं होतं.

दरम्यान परमवीरसिंग यांचे पत्र ही ठरवून केलेल्या एका कटाचा हिस्सा आहे. परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे आहे त्यामुळे चौकशीतून याची सत्यता समोर येईल असे नवाब मलिक आजच म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप कनेक्शनची शंका बळावल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: Given the current state of affairs in Maharashtra and the ongoing movement of former Mumbai Police Commissioner Parambir Singh, it should come as no surprise that he did not suddenly resign and enter politics. In it, his disciplined attempt to leave the original inquiry into the Sachin Vaze case and focus on the whole subject, Anil Deshmukh, says a lot.

News English Title: Former Mumbai Police commissioner history may repeat again news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x