27 April 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार
x

तुमचं वय ४५ वर्षांपेक्षा अधिक आहे? | मग १ एप्रिलपासून लस मिळणार

Central govt, Corona Vaccination, Age above 45 Years

नवी दिल्ली, २३ मार्च: देशात कोरोना संक्रमनामुळे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज देशात नवीन रुग्णांची संख्या ही 40,611 आढळली असून यात 29,735 उपचार घेत बरे झाले आहेत. तर 197 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी देशामध्ये 47,009 नवीन रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवड्यामध्ये पहिल्यांदा नवीन रुग्णांच्या संख्येत एवढी घट पाहायला मिळाली आहे. यापूर्वी 14 मार्चला 26,413 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यामध्ये सतत वाढ होत गेली.

गेल्या चोविस तासांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 10,676 ने वाढ झाली आहे. सध्या देशात 3 लाख 42 हजार 344 रुग्ण उपचार घेत आहे. आज हा आकडा 3.50 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कोरोना लसीकरण माहीम मोठ्या संख्येने राबवावी लागणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत चार कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा असे व्यक्ती आहेत ज्यांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

 

News English Summary: The Union Cabinet has approved the immunisation of all Indian citizens above the age of 45 years. The fourth phase, starting from April 1, will vaccinate all citizens above the age of 45 years. Union Minister Prakash Javadekar gave this information at a press conference in Delhi.

News English Title: Central govt approves corona Vaccination for people age above 45 Years from April 1 news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x