8 May 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार | हायकोर्टात जाण्याचा सल्ला

Supreme Court, Parambir Singh, High Court

नवी दिल्ली, २४ मार्च: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.

आपल्या याचिकेमध्ये परमबीर सिंहांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप लावत या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. याचिकेमध्ये सिंहांनी होमगार्ड डिपार्टमेंटसाठी आपल्या ट्रान्सफरलाही आव्हान दिले होते. राज्य सरकारचा हा आदेश बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला.

अनिल देशमुख यांच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. सिंह यांची याचिका न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर नोंदवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टात हजर होऊ शकतात.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh, who has moved the Supreme Court against Home Minister Anil Deshmukh’s misconduct, has expressed frustration. While asking why you did not go to the Mumbai High Court in this case, the Supreme Court has advised Singh to go to the High Court first.

News English Title: Supreme Court has advised Parambir Singh to go to the High Court first news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x