27 June 2022 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल Investment Planning | एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील | पॉलिसीचे तपशील जाणून घ्या
x

मुंबई पावसाळ्यात तुंबणार, सेना-भाजपमध्ये आतापासूनच खडाजंगी ?

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. अग्रलेखातील टीकेमुळे भाजप शिवसेनेमध्ये पुन्हां जुंपण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून त्यासाठी मोठयाप्रमाणावर खोदकाम करण्यात येत आहे. परंतु एक दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या पावसामुळे मुंबई महानगरपालिका टीकेचे लक्ष होऊ शकते हे ध्यानात घेऊन शिवसेनेने भाजपला आधीच लक्ष करायला सुरुवात केली आहे.

येत्या पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार हे सत्य बाहेर आल्याने नंतर मुंबई महापालिकेला दोष नको म्हणून शिवसेनेने आता पासूनच सर्व जवाबदारी राज्यसरकारच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामावर ढकलली आहे. परंतु मेट्रो प्रकल्प सुद्धा भाजप शिवसेना सरकारचाच प्रकल्प आहे याकडे पद्धतशीर कानाडोळा केला आहे. मुंबई मेट्रोच्या खड्ड्यांमुळे शहरात पाणी तुंबल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना घ्यावी लागेल असं अग्रलेखात मत व्यक्त करण्यात आलं आहे. मुंबई शहरावर लादलेले मेट्रोचे स्वप्न सुद्धा अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणे फसवे आहे. कोणतीही गरज नसताना भाजपने हे उद्योग सुरु केल्याचे सामनात म्हटले आहे.

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात?

मुंबईच्या खड्डय़ांची चर्चा सुरू होते व खड्डय़ांचे खापर मुंबई महानगरपालिकेवर फोडून इतर सर्व बाजारबुणगे आडास तंगडय़ा लावून बसतात. पण आता या सगळय़ांच्या कानाखाली मुंबई हायकोर्टानेच आवाज काढला आहे आणि ‘मुंबईचे रस्ते कोणाच्या आदेशाने खोदताय’, असा सवाल त्या मेट्रोवाल्यांना केला आहे. विकासाच्या नावाखाली आधी मोनो रेलने मुंबईत जागोजागी खड्डे केले व आता मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो प्रकल्पाने मुंबईभर भर उन्हाळय़ात चिखल व खड्डय़ांचे साम्राज उभे केले आहे.

त्यामुळे सामान्य मुंबईकरांची दिवसभर जी वाहतूककोंडी हेत आहे त्या कोंडीचे रूपांतर पावसाळय़ात जबडा वासलेल्या अक्राळविक्राळ मगरीत होणार अशी भीती आम्हास वाटते. एम.एम.आर.डी.ए. नावाची बाजारबसवी मुंबई महानगरपालिकेच्या छाताडावर आणून बसवल्यापासून मुंबईचे हाल हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणे झाले. म्हणजे मुंबईकरांना जगणे कठीण झाले आहे.

गरज नसताना सुरू केलेले हे नसते उद्योग आहेत. विकासाच्या नावाखाली मुंबईच्या रस्त्यांवर सरकारने अराजक निर्माण केले आहे. मेट्रोचे स्वप्न हे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणेच फसवे आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावले. असा हिसका मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आम्हीही मुंबईत दाखवू शकलो असतो, पण काही घडतंय ते बिघडवण्याची आमची वृत्ती नाही. पावसाळय़ात तुंबणाऱ्या मुंबईची जबाबदारी सरकार, त्यांचे मेट्रो कॉर्पोरेशन घेणार नसेल तर महापालिका आयुक्त अजोय मेहता कर्तव्यदक्षतेची किती उसळी मारतात ते आता पाहायचे. मेट्रेाच्या खड्डे शाहीविरोधात आयुक्तांनी आवाज द्यावा, शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x